नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयात नऊ नवीन न्यायाधीश नियुक्त करण्यात आले असून या नव्या न्यायाधीशांनी आज आपल्या अधिकार पदाची शपथ घेतली. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी त्यांना अधिकार पदाची शपथ दिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या संकुलातच हा शपथविधी पार पडला. या नव्या न्यायाधीशांमुळे सर्वोच्च न्यायालयातील एकूण न्यायाधीशांची संख्या आता 33 झाली आहे. या न्यायालयातील मंजूर न्यायाधीश क्षमता 34 इतकी आहे. सरन्यायाधीश यांच्यासह एकूण आता ही संख्या 34 झाली असल्याने पूर्ण क्षमतेने आता सुप्रिम कोर्ट कार्यरत होणार आहे.
नवीन शपथ घेणाऱ्या न्यायाधीशांमध्ये तीन महिला न्यायाधीश आहेत. या शपथविधीपूर्वी या न्यायाधीशांच्या नियुक्ती संबंधात राष्ट्रपतींकडून वॉरंट ऑफ अपॉईंन्टमेंट जारी होणे महत्त्वाचे असते ती जारी करण्यात आल्यानंतर हा शपथविधी झाला.