नगर – महानगरपालिकेच्या नगरचनाकार विभागात गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या 9 कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांचे आदेश आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी दिले आहेत.
आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग आदेशानुसार उपायुक्त प्रदीप पठारे यांनी एकूण 18 कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी काढले. त्यामध्ये नगरचनाकार विभागातील 9 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.