तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – येथील श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निलेश राक्षे यांची बिनविरोध निवड कारण्यात आली. ही निवडणूक शुक्रवारी (दि. ९) संस्थेच्या सभागृहात निवडणूक अधिकारी मंदार कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पार पडली.
या वेळी संस्थेचे संस्थापक सहकारभूषण बबनराव भेगडे, पीएमआरडीए सदस्य संतोष भेगडे, माजी अध्यक्ष राहुल पारगे, शरद भोंगाडे व सर्व संचालक आणि संस्थेचे सभासद उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱयांचा सन्मान करण्यात आला. संस्थेचे नवनिर्वाचित पदाधिकारी पुढील प्रमाणे-ः उपाध्यक्ष विकास कंद, समीर भेगडे, सचिव अतुल राऊत, खजिनदार अमित भसे.