अमरावती – अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा या नेहमीच त्यांच्या बिनधास्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आजही त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. आज मोठ्या उत्साहाने खासदार नवनीत राणा या रामनवमी साजरी करत असल्याचे दिसून येत आहे.
त्यांचा गुरुवारच्या दिवसाचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे. भगवा स्कार्फ परिधान करून नवनीत राणा या बुलेट या दुचाकीवर स्वार झालेल्या पाहायला मिळाल्या. पण बुलेट चालवताना हेल्मेट न घातल्याने नेटकऱ्यांकडून आता खासदार नवनीत राणा यांना ट्रोल करण्यात येत आहे.
खास रामनवमीच्या निमित्ताने राणा यांनी हा व्हिडीओ तयार केला असल्याचे समजते. काळ्या रंगाचा चुडीदार परिधान करून, डोक्याला भगव्या रंगाचा स्कार्फ गुंडाळून राणा या बुलेटवर स्वार झाल्या. आम्ही अखंड विश्वाचे राजा श्रीरामचे भक्त आहोत..
आम्ही पराभवाची चिंता करत नाही आणि विजयाचा उल्लेख करत नाही. जय श्री राम.. असे त्या या व्हिडीओमध्ये बोलत असल्याचे दिसून येत आहेत. यानंतर त्या हेल्मेट न घालता वेगाने बुलेट चालवताना या व्हिडीओमध्ये दिसून येत आहेत.