नवी दिल्ली – राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांच्यावर आज (सोमवार ) किडनी प्रत्यारोपण होणार आहे. त्यांची मुलगी रोहिणी आचार्य वडिलांना किडनी दान करत आहे. आज वडील आणि मुलगी दोघांवर सिंगापूरमध्ये शस्त्रक्रिया होत आहेत.
Ready to rock and roll ✌️
Wish me a good luck 🤞 pic.twitter.com/R5AOmFMW0E— Rohini Acharya (@RohiniAcharya2) December 5, 2022
लालू यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य हिने वडिलांसोबतचे हॉस्पिटलमधील फोटो जारी केले आहेत. लेक रोहिणीने एक भावनिक ट्विटही केले आहे. ज्यामध्ये मी तयार आहे असे लिहिले आहे. सर्वांच्या प्रार्थनांचे आवाहनही करण्यात आले आहे.
लाल यादव यांचे संपूर्ण कुटुंब आज सिंगापूरमध्ये आहे. जिथे लालू यादव आणि त्यांची मुलगी रोहिणी यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. रोहिणी तिच्या वडिलांना किडनी दान करत आहे. लालू यादव यांची पत्नी कुटुंबासोबत सिंगापूरमध्ये राहते.
लालू यादवसह त्यांची मुलगी रोहिणी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सिंगापूरच्या माउंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये लालू यादव यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे.
रोहिणी आचार्य यांची भावूक पोस्ट…
किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या लालूंचे प्राण वाचवण्यासाठी रोहिणी आचार्य किडनी दान करत आहेत. त्यांनी हा निर्णय घेतल्यानंतर ट्विटरवर भावूक पोस्ट केली होती…
त्यात त्यांनी लिहिलंय… मी बाबांसाठी काहीही करू शकते. माझ्या मते शरीरातील फक्त मांसाचा एक छोटासा तुकडा मी देतेय.
तुम्ही सगळ्यांनी सर्वकाही ठिक होईल, यासाठी प्रार्थना करा. बाबांनी पुन्हा यावं आणि लोकांचा आवाज बनावं, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे..