वेलिंग्टन – न्यूझीलंड सरकारने एक महत्वाची घोषणा केली असून 14 वर्षांखालील मुलांना संपूर्ण आयुष्यात कधीच देशात सिगारेट विकत घेणे किंवा ओढणे बंदी असणार आहे, असे जाहीर करण्यात आले आहे आहे.
न्यूझीलंड सरकारने तयार केलेल्या नव्या नीतीनुसार 2024 पासून टप्प्याटप्प्याने न्यूझीलंडची वाटचाल सिगरेट मुक्त देश होण्याची असेल आणि 2027 पासून देशात सिगरेट किंवा तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर पूर्ण बंद लागू करण्यात येणार आहे.
न्यूझीलंडच्या आरोग्य विभागाच्या राज्यमंत्री आयशा वेराल म्हणाल्या, देशात धुम्रपान केलेच जाऊ नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तंबाखू विक्री, खरेदी आणि पुरवठा हा गुन्हा मानला जाणार आहे. गेल्या दशकात देशात धूम्रपानाचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र नवीन कायद्यामुळे आता ज्यांचे वय 14 किंवा त्यापेक्षा कमी आहे त्यांना पुढील काळात म्हणजे 2027 पासून देशात कधीच सिगारेट खरेदी करता येणार नाही.
न्यूझीलंडमध्ये 2024 पासून टप्प्याटप्प्याने सिगरेटवर बंदी घातली जाणार आहे. सरकारी आकडेवारीनुसार देशात 15 वर्षांवरील सर्व युवक सिगरेट ओढतात. तरुण तसेच आगामी तरुणाईला सिगरेटपासून दूर ठेवण्यासाठी 2022च्या शेवटी कायदा करण्यात येत आहे. हे विधेयक पुढच्या वर्षात संसदेत मांडले जाणार असून 2024 पासून कायद्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. न्यूझीलंडमध्ये दरवर्षी धुम्रपान केल्याने 5 हजार मृत्यू होतात आणि 18 वर्षाखालच्या प्रत्येक 5 मुलांमध्ये 4 मुले धुम्रपान करतात.