-->

नागपुरात शाळा, महाविद्यालये 7 मार्चपर्यंत बंद

शनिवार-रविवार बाजारपेठा बंद

नागपूर – राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना जिल्हास्तरावर कठोर पावले उचलली जात आहेत. अमरावती आणि पुण्यासह अकोल्याने कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेता निर्बंधांची घोषणा केलीच होती, त्यात आता नागपूरची भर पडली आहे. नागपुरात शनिवार, रविवार असे आठवड्यातील दोन दिवस बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राउत यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

रविवारी देशभर 13,979 नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 9,476 रुग्ण बरे झाले आहेत. अर्थातच 4,412 सक्रीय रुग्णांची वाढ झाली आहे. ही वाढ 87 दिवसांत सर्वाधिक आहे. तसेच रविवारी कोरोनामुळे 79 जणांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी 25 नोव्हेंबर रोजी 7,234 अॅक्टिव्ह रुग्ण वाढले होते. अॅक्टिव्ह किंवा सक्रीय रुग्ण म्हणजे असे रुग्ण की ज्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

नागपूर बैठकीत झालेले निर्णय
1. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या ‘मी जबाबदार’ मोहिम नागपुरात राबविली जाणार
2. हॉटेल, रेस्तरला 50 टक्के क्षमतेपर्यंत परवानगी असेल, पण रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ते बंद असतील
3. धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रम 7 मार्चपर्यंत बंद राहतील
4. मंगल कार्यालये, लॉन, रिसॉर्ट यांना 25 फेब्रुवारीपासून 7 मार्चपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना
5. कोव्हिड सेंटर पुन्हा सुरू करणार, चाचण्यांचे प्रमाण वाढवले जाणार
6. नागरिकांनी कुठलेही लक्षण आढळल्यास चाचणी करावी असे आवाहन

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.