मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा चित्रपटाच्या पडद्यावर कमी दिसत असली तरी सोशल मीडियावर तितकीच सक्रिय राहते. नुकतीच नेहाने मुंबईतील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी सर्वांच्या नजरा अभिनेत्रीच्या लूकवर खिळल्या होत्या.कारणही तसेच होते. नेहाने परिधान केलेला स्टायलिश ड्रेस सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
यादरम्यानचा नेहाचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये ती कोणाशी तरी बोलताना दिसत आहे.यावेळी नेहा आकर्षक पिवळ्या रंगाच्या लेहेंग्यात दिसत आहे. नेहाने या लेहेंग्यावर अतिशय सुंदर ब्लाउज कॅरी केला आहे. यासोबत तिने गळ्यात हिरव्या रंगाचा भारी नेकलेस देखील घातला होता, ज्यामुळे ती आणखीनच सुंदर दिसत होती. अभिनेत्रीची ही स्टाईल अनेकांना आवडली असली तरी अनेक यूजर्सनी तिला प्रचंड ट्रोल केले.
नेहाच्या या मादक स्टाईलवरून अनेकांनी तिला सुनावले आहे तर अनेकांना तिचा हा अंदाज बोल्ड अंदाज आवडला देखील आहे. नेहा शर्माच्या या लूकवरून अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका युजरने दुसरी उर्फी जावेद अशी कमेंट केली आहे.चुकीचा शिवला की परिधान करताना चूक झाली ? असा सवाल देखील यावेळी एका युजरने केला आहे. तर आणखी एकाने तू काहीही घाल तरी हॉटचं दिसतेस असं म्हंटल आहे.
View this post on Instagram
नेहाने 2007 साली एका तेलगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिने 2010 मध्ये क्रुक चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती जयंतभाई की लव्ह स्टोरी, यमला पगला दीवाना 2, यंगिस्तान, मुबारकान, तानाजी यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली. लवकरच तिचा जोगिरा सा रा रा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.