साउथ इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा लवकरच बॉलीवूडमध्ये डेब्यू करण्याच्या तयारीत आहे. बॉलीवूडमधील रोमांस किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानसोबत ती झळकणार आहे. ही नवीन जोडी डायरेक्टर एटली यांच्या आगामी चित्रपटात काम करणार आहे.
काही दिवसांपासून शाहरुख खान आणि एटली यांच्या नवीन चित्रपटाबाबत चित्रपटसृष्टीत सातत्याने चर्चा सुरू आहे. या चित्रपटात शाहरुखसह नयनतारा मुख्य नायिकेची भूमिका साकारणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
नयनताराच्या एंट्रीमुळे शाहरुख खानचा हा चित्रपट पॅन इंडिया चित्रपट ठरणार आहे. या चित्रपटात कन्नड अभिनेता सुदीप हा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
हा चित्रपट तमिळमधील “मर्सल’ चित्रपटाचा हिंदी रीमेक असणार आहे. हा चित्रपट एटली यांनी विजयसह डायरेक्ट केला होता. यात विजयने तिहेरी भूमिका साकारली होती.
शाहरुख खानच्या आगामी प्रोजेक्टबाबत सांगायचे झाल्यास तो लवकरच “पठाण’ चित्रपटात झळकणार आहे. यात त्याच्यासोबत दीपिका पादुकोण् आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिका साकारत आहेत.
तसेच राजकुमार हिरानीसोबतही शाहरुख एका चित्रपटात काम करत आहे. याशिवाय संजय लीला भंसालीच्या एका रोमांटिक चित्रपटही शाहरुखने साईन केलेला आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृतपणे घोषणा करण्यात आलेली नाही.