मुंबई – आपल्या भूमिकांमुळे नेहमी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी दरवेळी काहीतरी वेगळं आणि हटके करण्याचा प्रयत्न करत असतो. मग कधी तो दगड फोडणारा मांजी होतो तर कधी गँगस्टर गणेश गायतोंडे. दर वेळी काहीतरी भन्नाट करणाऱ्या नवाजने यावेळी देखील प्रेक्षकांसाठी काहीतरी चकित करणारी गोष्ट आणली आहे.
नवाजने आपल्या ‘हड्डी’ या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित केले. पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित होताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. यावेळी नवाज थेट स्त्री पात्राच्या भूमिकेतून दिसणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. त्याचा हटके लूक पाहून तर चाहत्यांना हा नवाज आहे यावर देखील विश्वास ठेवणे थोडे कठीण जात आहे.
Crime has never looked this good before. 🔥 #Haddi, a noir revenge drama starring @nawazuddin_s in a never-seen-before avatar.
Filming begins, releasing in 2023.@AkshatAjay @rajesh_rosesh #SaurabhSachdeva #ShreeDharDubey @imadityakashyap @jayoza257 @ravibasrur pic.twitter.com/HJbFk3thcT— Zee Studios (@ZeeStudios_) August 23, 2022
हड्डी हा चित्रपट पुढच्या वर्षी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. पोस्टरमध्ये नवाज एका चेअरवर बसलेला दिसतोय. एखाद्या महिलेप्रमाणे वाढलेले केस,चेहऱ्यावर लिपस्टिकसह केलेला मेकअप आणि त्यात परिधान केलेला सिल्व्हर कलरचा ग्लॅमरस ड्रेस यामुळे नवाजला ओळखणे खरंच कठीण आहे. अनेकांनी तर हा नवाज नाही अर्चना पुरणसिंह आहे असे म्हणत खिल्ली उडवली तर कित्येकांनी हा धाडसी निर्णय असल्याचे म्हणत नावाजला शुभेच्छा दिल्या आहेत.