नवी दिल्ली – दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथे स्थित गुरुद्वारा बंगला साहिब हे देशातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र आहे. येथे दररोज हजारो भाविक येतात. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अभिनेत्री नेहा शर्मा नुकतेच या धार्मिक ठिकाणी स्पॉट झाले. यावेळी दोघेही बंगला साहिब गुरुद्वारात नतमस्तक झाल्याचे पाहायला मिळाले.
नवाजुद्दीन आणि नेहाचा ‘जोगिरा सारा रा रा’ हा चित्रपट २६ मे रोजी प्रदर्शित होत आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाचे प्रमोशन जोरात सुरु आहे. चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यापूर्वी नवाजुद्दीन आणि नेहा यांनी गुरुद्वाराला भेट दिली. यावेळेसचे दोन्हही स्टारचे काही फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
नवाजुद्दीन सिद्दीकी आणि नेहा शर्मा यांनी केवळ गुरुद्वारालाच भेट दिली नाही तर दिल्लीतील लोकांशी संवादही साधला. त्यांनी येथे चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले. अभिनेत्री नेहा शर्माने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिल्लीतील मुलींसोबत डान्स करताना दिसत आहे. यासह अभिनेत्रीने चाहत्यांसोबत सेल्फी देखील काढला.
View this post on Instagram
नवाज नेहाच्या या प्रमोशनचे चाहत्यांनी कौतुक केले आहे. मात्र काही नेटकऱ्यांना स्टार्सची ही गोष्ट चांगलीच खटकली आहे. प्रमोशनसाठी तीर्थ क्षेत्राचा वापर करणे चुकीचे असल्याचे नेटकऱ्यांनी म्हंटले आहे. नवाझुद्दीन आणि नेहा हे दोन्हही स्टार्स पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार असलयामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता आहे.