नवी दिल्ली – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नुकतेच नवी दिल्ली इथे राष्ट्रीय कॉर्पोरेट सामाजिक दायित्व पुरस्कार (एनसीएसआरए) प्रदान केले. कॉर्पोरेट सामाजिक दायित्व क्षेत्रामध्ये अनन्य साधारण योगदान दिल्याबद्दल त्याचे कौतुक म्हणून कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाने राष्ट्रीय कॉर्पोरेट सामाजिक दायित्व पुरस्कार देण्याची योजना तयार केली आहे.
समाजातल्या गरजवंत लोकांपर्यंत कॉर्पोरेट क्षेत्राकडून आवश्यक ती मदत पोहोचत आहे, हे पाहून आपल्याला आनंद होत असल्याची भावना राष्ट्रपती कोविंद यांनी पुरस्कार प्रदान करताना व्यक्त केली. कॉर्पोरेट क्षेत्राने राष्ट्रीय लक्ष्य साध्य करण्यासाठी जे अमूल्य योगदान दिले आहे, त्याचेही त्यांनी कौतुक केले. तसेच कॉर्पोरेट क्षेत्राने दीर्घकाळ प्रभावशाली ठरतील अशा स्थायी योजना राबविल्याचे त्यांनी नमूद केले.
सरकार सामाजिक दायित्व आधिक कृतिशील बनवण्यासाठी त्याच्या स्वरूपाला नवे रूप देण्याविषयी कार्यरत असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. सामाजिक सद्भावना वाढीसाठी “सीएसआर’ची व्याप्ती अधिक वाढवण्यावर भर देण्याविषयी त्यांनी आवाहन केले.