Mustafizur Rahman Release : मोठी बातमी! BCCI च्या आदेशानंतर मुस्तफिजुर रहमानला KKR मधून डच्चू

Mustafizur Rahman releases from KKR Squad : आयपीएल २०२६ (IPL 2026) च्या हंगामापूर्वी कोलकाता नाइट राइडर्स (KKR) संघ मोठ्या वादात सापडला आहे. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याला ९.२० कोटी रुपयांना विकत घेतल्यामुळे केकेआरवर चोहोबाजूंनी टीका होत होती. आता या प्रकरणात बीसीसीआयच्या निर्देशानंतर केकेआरने मुस्तफिजुर रहमानला संघातून रिलीज केले आहे.
नेमके प्रकरण काय?
डिसेंबरमध्ये झालेल्या आयपीएलच्या मिनी ऑक्शनमध्ये मुस्तफिजुर रहमानला घेण्यासाठी केकेआर आणि सीएसके यांच्यात जोरदार चढाओढ पाहायला मिळाली होती. अखेर केकेआरने ९.२० कोटी रुपयांची मोठी बोली लावून त्याला आपल्या ताफ्यात सामील केले. मात्र, भारत-बांगलादेश यांच्यातील राजकीय तणावामुळे मुस्तफिजुर रहमानला संघातून वगळण्याच्या मागणीने जोर धरला. ज्यामुळे आता बीसीसीआयच्या सांगण्यावरुन केकेआरने त्याला संघातून रिलीज केले.
बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया काय म्हणाले?
#WATCH | Guwahati | BCCI secretary Devajit Saikia says, “Due to the recent developments that are going on all across, BCCI has instructed the franchise KKR to release one of their players, Mustafizur Rahman of Bangladesh, from their squad and BCCI has also said that if they ask… pic.twitter.com/53oxuRcmZp
— ANI (@ANI) January 3, 2026
वाढता वाद आणि सध्याच्या घडामोडी लक्षात घेता, बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी कोलकाता नाइट राइडर्सला खास सूचना दिल्या होत्या की, “सध्याची परिस्थिती पाहता केकेआरने मुस्तफिजुर रहमानला आपल्या स्क्वॉडमधून त्वरित रिलीज करावे. जर केकेआरला त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूची गरज असेल, तर बीसीसीआय त्यांना पर्यायी खेळाडू उपलब्ध करून देईल.” त्यानुसार केकेआरने त्याला रिलीज केले.
मुस्तफिजूर रहमानची जागा कोण घेईल?
KKR Media Advisory. 🔽 pic.twitter.com/ZUZB620Uv7
— KolkataKnightRiders (@KKRiders) January 3, 2026
केकेआरने मुस्तफिजूर रहमानला संघातून वगळले आहे, पण आता प्रश्न असा आहे की, त्याच्या जागी कोणता खेळाडू येऊ शकतो. आयपीएल लिलावात काही मोठी नावे विक्रीला आली नाहीत आणि आता, रहमानला वगळल्याने त्यांना संधी मिळू शकते. आयपीएल २०२६ मध्ये केकेआरमध्ये मुस्तफिजूर रहमानची जागा घेण्याची क्षमता असलेल्या पाच गोलंदाजांमध्ये फझलहक फारुकी, जोशुआ लिटीन, स्पेन्सर जॉनसन आणि रिचर्ड ग्लिसन या पैकी एका गोलंदाजाला संधी मिळू शकते.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाची (BCB) भूमिका
या वादावर बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमीनुल इस्लाम बुलबुल यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “आम्ही या संपूर्ण प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून आहोत. आम्ही क्रिकेटकडे राजकारणाच्या चष्म्यातून पाहत नाही. भारत हा आमचा शेजारी देश असून आमचे क्रिकेटचे संबंध अतिशय सलोख्याचे आहेत. केकेआरमध्ये मुस्तफिजुर हा एकमेव बांगलादेशी खेळाडू होता, त्यामुळे पुढे काय होते याकडे आमचे लक्ष असेल.”





