IPL Auction 2026 : आयपीएल ऑक्शन कधी, कुठे आणि किती वाजता पार पडणार? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

IPL Auction 2026 : इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2026 च्या मिनी-ऑक्शनची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. आयपीएलमधील सर्वच्या सर्व १० संघ आपल्या स्क्वॉडला अधिक मजबूत करण्यासाठी सर्वोत्तम प्लेयर्सच्या शोधात आहेत. यंदाच्या आयपीएल लिलावात भरल्या जाणाऱ्या 77 स्लॉट्ससाठी सर्व फ्रँचायझींकडे मिळून तब्बल 237.55 कोटी इतकी रक्कम उपलब्ध आहे. तर परदेशी खेळाडूंसाठी 27 जागा शिल्लक आहेत.
कधी आणि कुठे पार पडणार ऑक्शन?
आयपीएल 2026 चा लिलाव मंगळवार, 16 डिसेंबर रोजी होणार आहे. दुपारी अडीच वाजता या लिलावाला सुरुवात होणार आहे. हा लिलाव लिलाव अबू धाबी, यूएई येथे पार पडणार आहे. मागील दोन लिलाव भारताबाहेर जेद्दाह (2024) आणि दुबई (2023) या ठिकाणी पार पडले होते.
कुठं लाईव्ह पाहता येईल ऑक्शन?
आयपीएल 2026 च्या लिलावाचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या वाहिन्यांवर होईल. आयपीएल 2026 चा लिलाव जिओहॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीम केला जाईल, इथं तुम्ही लाईव्ह पाहू शकता.
कोणत्या संघाकडे किती रक्कम आणि किती जागा शिल्लक?
कोलकाता नाईट रायडर्स – 64.3 कोटी रुपये (13 जागा शिल्लक)
चेन्नई सुपर किंग्ज – 43.4 कोटी रुपये (9 जागा शिल्लक)
गुजरात टायटन्स – 12.9 कोटी रुपये (5 जागा शिल्लक)
सनरायझर्स हैदराबाद – 25.5 कोटी रुपये (10 जागा शिल्लक)
पंजाब किंग्ज – 11.5 कोटी रुपये (4 जागा शिल्लक)
लखनऊ सुपर जायंट्स – 22.95 कोटी रुपये (6 जागा शिल्लक)
दिल्ली कॅपिटल्स – 21.8 कोटी रुपये (8 जागा शिल्लक)
मुंबई इंडियन्स – 2.75 कोटी रुपये (5 जागा शिल्लक)
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू – 16.4 कोटी रुपये (8 जागा शिल्लक)
राजस्थान रॉयल्स – 16.05 कोटी रुपये (9 जागा शिल्लक)





