कोलकाता – आयपीएल 2023 च्या 56 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स असा होणार आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियम वर खेळवला जाणार आहे. तसेच पराभवाची हॅट्ट्रिक करणारा संजू सॅमसनची पिंक आर्मी पुन्हा विजयी मार्गावर येण्यासाठी आसुसलेली आहे.
दुसरीकडे, केकेआरने सलग दोन विजय नोंदवून फॉर्ममध्ये पुनरागमन केले आहे. सध्या आयपीएल चा शेवटचा टप्पा सुरु असून प्ले ऑफ मध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी प्रयेक संघ आपआपली कंबर कसत आहे. त्यामुळे आजचा सामना कोण जिंकतंय हे बघणं महत्वाचे ठरेल.
कोलकाता नाइट राइडर्स –
जेसन रॉय, रहमानुल्लाह गुरबाज, नितीश राणा ( कर्णधार ), वेंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंह, शार्दुल ठाकुर, सुनील नरेन, हर्षित राणा, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती
राजस्थान रॉयल्स –
यशस्वी जायसवाल, जोस बटलर, संजू सॅमसन ( कर्णधार ), शिमरॉन हेटमायर, जो रूट, ध्रुव जुरैल, रविचंद्रन अश्विन, संदीप शर्मा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, औबेड मेकॉय