पिंपरी -शहरात महापालिकेकडून विविध केंद्रांवर करण्यात येणारे करोना लसीकरण बुधवारी (दि. 29) बंद राहणार आहे. लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुट्टी असल्याने हे केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या प्राप्त मार्गदर्शक सुचनांप्रमाणे 16 जानेवारीपासून करोना लसीकरणास सुरुवात झाली. सुरुवातीला फ्रंटलाइन आणि हेल्थकेअर वर्कर यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्याने ज्येष्ठ नागरिक, दुर्धर आजाराचे रुग्ण यांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. सध्या 18 वर्षापुढील सर्व वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे.