मुंबई – दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या रस्त्यावर कोरियन महिलेचा लाईव्ह युट्युब स्ट्रीमिंग दरम्यान काही भामट्यांनी विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला होता. सोशल मीडियावर याबाबतचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. आता मुंबईतील खारमध्ये एका महिलेचा ऑनलाईन डिलिव्हरी देण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पीडित महिलेने ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली आहे महिला ट्विटमध्ये म्हणते,मी ३० नोव्हेंबरला झेप्टो कंपनीद्वारे मागवलेले घरगुती सामान देण्यासाठी एक डिलिव्हरी बॉय आला होता. त्याला सामानाचे पैसे देत असताना तो चोरून माझा व्हिडीओ काढत असलयाचे माझ्या लक्षात आले. मी त्याला मोबाईल दाखवण्यास सांगितले असता १५ मिनिट त्याने फोन दिला नाही. अखेर मी त्याला फोन दे नाहीतर सिक्युरिटीला बोलावेल अशी धमकी दिली. त्यानंतर तो माझ्या परवानगीशिवाय माझ्या घरात घुसला आणि गैरवर्तन करू लागला असे पीडित महिलेने सांगितले.
Hi Sabeena,
We take such matters with utmost seriousness. We are partaking in a thorough investigation of the incident with the local law enforcement bodies.We condemn such behavior. Stringent action will be taken on perpetrators based on facts.
— Zepto Cares (@zeptocares) December 1, 2022
तो घरात येताच महिला थेट किचनमध्ये पळाली आणि तिने सुरक्षा रक्षकाला खिडकीतून आवाज दिला. त्यानंतर सुरक्षा रक्षक तिथे आला आणि त्याने त्या इसमाकडून मोबाईल घेतला असता त्यामध्ये माझा व्हिडीओ होता असं महिलेने यावेळी सांगितले. तसेच सुरक्षा रक्षक वेळेत आल्यामुळे बचावली मात्र झेप्टोवरून ऑर्डर करणारी कोणतीच महिला सुरक्षित नसल्याचे यावेळी या महिलेने म्हंटले आहे.
Like how? Your local team has been contacting me by saying “please let’s communicate and compromise” like seriously? Because of you @zeptocares @ZeptoNow I had to go through such a horrible incident.
— Sabeena (@sabeenasyed8) December 2, 2022
झेप्टो कंपनीने केला खुलासा
महिलेने ट्विटरवर झेप्टो या कंपनीसह मुंबई पोलिसांना देखील टॅग केले आहे. अशावेळेस झेप्टो कंपनीने आम्ही स्थानिक पोलिसांना पूर्ण सहकार्य करत असल्याचे म्हटले तसेच जर ती व्यक्ती दोषी आढळली तर तिच्यावर कारवाई देखील करू असं कंपनीचं म्हणणं आहे. महिलेने कंपनीच्या या ट्विटला रिप्ले देत तुमची स्थानिक टीम मला विषय संपवा असं म्हणत आहे तुम्ही खरंच कारवाई करणार का ? तुमच्यामुळे मला या भयानक प्रसंगातून जावं लागलं असल्याचं महिलेने ट्विटमध्ये म्हंटले.