नवी दिल्ली : देशातील करोना रुग्णात थोडी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी देशातील करोनाबाधितांची संख्या किंचित कमी झाली आहे. आज देशात 253 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर सक्रिय रुग्णांची संख्या चार हजारांवर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत देशात तीन रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. काल देशात 275 रुग्ण आढळले होते. त्या तुलनेने आज 22 रुग्णांची घट झाली आहे.
देशात आज करोना संसर्गात किचिंत घट झाली आहे. देशात शुक्रवारी 275 कोरोना रुग्ण आढळले होते, तर आज गुरुवारी 253 कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर आत तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 219 कोटीहून अधिक करोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. या लसीकरणामुळे कोरोनाचा वेग कमी करण्यात प्रशासनाला मदत झाली आहे. मात्र धोका अद्यापही पूर्णपणे टळलेला नाही.
Single-day rise of 253 new Covid cases in India, active cases decline from 4,672 to 4,597: health ministry
— Press Trust of India (@PTI_News) December 3, 2022
भारतात करोना महामारी सुरु झाल्यापासून चार कोटीहून अधिक लोकांना करोनाची लागण झाली आहे. तर देशात आतापर्यंत पाच लाखांहून अधिक जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतात करोनाचा संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 4 कोटी 46 लाख 73 हजार 166 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत एकूण 5 लाख 30 हजार 627 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या देशातील करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 4,597 एवढी आहे.
जगासह देशात करोनाचा संसर्ग कायम असून त्यासोबतच भारतात इतर संसर्गजन्य रोगांचा धोका वाढताना दिसत आहे. देशात व्हायरल फ्लू, सर्दी, खोकला यांसह गोवरचा धोका दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.