चिंबळी – मोशी येथील नागेश्वर महाराज उत्सवात गुरुवारी (दि.३) रोजी पार पडलेल्या लिलावात मानाचा विडा गणेश तुकाराम कुदळे यांनी 91 लाखाची बोली लावत मिळविला. तर मानाची ओटी निलेश उद्धव बोराटे यांनी बोली लावून तब्बल ३९ लाख २०२२ रुपयाला मिळवली. सदर लिलावात बोली लावण्याचा मान सालाबादप्रमाणे केदारी कुटुंबाला देण्यात आला होता यामध्ये प्रामुख्याने नारायण केदारी,सागर केदारी, निखिल केदारी यांनी लिलावचे काम पाहिले.
कोरोनामुळे दोन वर्षे यात्रा मर्यादित स्वरूपात करण्यात आली होती.यंदा मात्र जल्लोषात उत्सव साजरा करण्यात आला.परंपरे नुसार सर्व धार्मिक विधी,परंपरा पार पाडण्यात आल्या.परंपरेनुसार लिलाव उत्सव नागेश्वर महाराज सभामंडपामध्ये सकाळी १० वाजल्यापासून सुरू झाला.
देवाच्या दारात पैशाला मोल नाही हेच खर याचा प्रत्यय करून देणारा हा लिलाव आहे हे त्या लिलावात सुरुवाती पासून शेवट पर्यंत बसणाऱ्या हमखास जाणवते.उत्सवातील वस्तूंचा लिलाव हा पंचक्रोशीतील भाविकांच्या दृष्टीने एक विशेष पर्वणीचा सण असतो.त्यामुळे लिलाव पाहण्यासाठी सभा मंडपामध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.
दरवर्षी या लिलावामध्ये भाविकांना अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या वस्तूंचा व भंडाऱ्यातील प्रसाद व वस्तूंचा बोली लावून लिलाव केला जातो.ग्रामस्थांकडून भंडाऱ्यातील महाप्रसाद बनविण्याची भांडी दरवर्षी नव्याने खरेदी केली जातात.