मोतिहारी/पाटणा – बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यातील विषारी दारू दुर्घटनेतील मृतांची संख्या सोमवारी 26 वर पोहोचली असून मोतिहारीमध्ये बनावट मद्य प्राशन केल्यानंतर आणखी चार जणांचा मृत्यू झाला आहे, असे एसपी कांतेश कुमार मिश्रा यांनी सांगितले.आणखी 20 जणांवर जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून जिल्हा पोलिसांनी तुर्कौलिया, हरसिद्धी, सुगौली आणि पहारपूर पोलीस स्टेशन आणि रघुनाथपूर चौकीच्या प्रमुखांना निलंबित केले आहे. गेल्या दहा तासांत आणखी चार मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या आता 26 वर पोहोचली आहे.
रविवारी नऊ चौकीदारांसह 11 पोलिस कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली, ते म्हणाले की, जिल्हा पोलिसांनी आतापर्यंत पाच गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे. पूर्व चंपारण पोलिसांनी जिल्ह्यात दारूच्या अवैध व्यापारात सहभागी असल्याच्या आरोपावरून 80 जणांना अटक केली आहे.