वॉशिंग्टन : मृतदेहाच्या टाळुवरचे लोणी खाणे हा वाक्प्रचार जरी भारतामध्ये लोकप्रिय असला तरी हा वाक्प्रचार प्रत्यक्षात आणण्याचे काम अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात उघड झाले आहे. या विद्यापीठाच्या वैद्यकीय शाखेत काम करणाऱ्या एका पती-पत्नी जोडप्याने गेल्या कित्येक वर्षापासून मृतदेहांचे अवयव विकण्याचा व्यवसाय चालू ठेवला होता. या माध्यमातून त्यांनी हजारो लाखो रुपये कमावले होते.
विद्यापीठाच्या हार्वर्ड मेडिकल स्कूल मधील मृतदेहांचे अनेक अवयव विकून ह्या दांपत्याने पैसा कमावला आहे. त्यांच्या व्यवसायाची भांडाफोड झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली असून त्यांचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्यांना किमान 15 वर्षे शिक्षा होईल असे बोलले जात आहे.
बीबीसी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीप्रमाणे, या मेडिकल स्कूलला अनेक लोक आपले शरीर दान करत असतात संशोधनासाठी आणि वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा म्हणून अनेक लोक या ठिकाणी आपले शरीर दान करत असतात. दान म्हणून मिळालेल्या या शरीरांचा या दांपत्याने व्यापार केला होता. या शरीरातील हाडे आणि इतर महत्त्वाचे अवयव विकण्याचे काम या दांपत्याने केले होते सेद्रीक लॉज असे या दांपत्यातील पुरुषाचे नाव असून तो या हार्वर्ड स्कूल मधील शवागरात व्यवस्थापकाचे काम करत होता. त्याची पत्नीचे नाव डॅनिश असे असून तीही त्याला या कामांमध्ये मदत करत होती.
अवयव विकण्याचे काम हे दाम्पत्या ऑनलाइन पद्धतीने करत होते. त्यासाठी त्यांनी मोठ्या नेटवर्कची उभारणीही केली होती. 2020 मध्ये या दांपत्याकडे एक महिला ग्राहक आले होते. तिचा बाहुली बनवण्याचा व्यवसाय होता तिने या दांपत्याकडून एका मृतदेहाच्या चेहऱ्याची खरेदी केली होती.
एखाद्या ग्राहकाला मानवी शिराची गरज असेल तर 80 हजार रुपयात हे शीर विकले जात असे त अनेक वर्षापासून त्याचा व्यवसाय सुरू होता. पण एका ग्राहकाच्या माध्यमातूनच पोलिसांना या व्यवसायाची खबर लागली आणि त्यांनी या दांपत्याला जेरबंद केले करत लवकरच न्यायालयात खटला सुरू होणार आहे.