MLA slap to voter । लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या चौथ्या टप्प्यातील मतदानादरम्यान, विचित्र घटना घडली आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाच्या नेत्याकडून मतदारांना मारहाण केल्याची माहिती समोर आलीय. युवाजन श्रमिका रायतू काँग्रेस पक्षाचे (वायआरएससीपी) नेते व्ही एस शिवकुमार यांचे गुंटूरमधील मतदान केंद्रावर एका मतदाराशी भांडण झाले. भांडणाचे रूपांतर शेवटी जोरदार हाणामारीत झाली. एका वृत्तसंस्थेने त्याचा व्हिडिओ पोस्ट केला होता.
आमदाराने मतदाराला लगावली कानाखाली MLA slap to voter ।
YRSCP नेते आणि मतदार यांच्यातील भांडणाच्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, YRSCP नेते VS शिवकुमार यांनी मतदाराला सुरुवातीला कानाखाली लागलेली. यानंतर समोरच्या व्यक्तीनेही शिवकुमारला चापट मारत प्रत्युत्तर दिले. पुढे काही वेळातच शिवकुमारचे साथीदार आणि मतदारासोबत आलेले लोक यांच्यात मारामारी सुरू झाली. शिवकुमार याच्या कार्यकर्त्यांनी मतदारांवर हल्ला केला. दरम्यान, या सगळया गोंधळात मतदान करण्यासाठी आलेल्या नागरिकांना ताटकळत उभं राहावं लागलं.
వైసీపీ రౌడీయిజం, గూండాగిరికి భయపడేదే లేదు.. తగ్గేదేలేదు అంటున్న ఓటర్లు… మీ ధైర్యానికి నా హాట్సాఫ్!#YSRCPRowdyism#EndOfYCP#JaruguJagan #AndhraPradeshElections2024 pic.twitter.com/93SVIt1qfe
— Lokesh Nara (@naralokesh) May 13, 2024
आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल चा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. निवडणुकीत आपला पराभव दिसत असल्यानेच वायएसआरसीपी पक्षाचे नेते हिंसा आणि मारहाणीच्या घटना करत असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल MLA slap to voter ।
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. निवडणुकीत आपला पराभव दिसत असल्यानेच वायएसआरसीपी पक्षाचे नेते हिंसा आणि मारहाणीच्या घटना करत असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून घटनेचा अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशमध्ये किरकोळ घटना वगळता आत्तापर्यंत शांततेत मतदान पार पडले असून सकाळी 11 वाजेपर्यंत राज्यात 18.81 टक्के मतदान झाले आहे. दरम्यान, येथील 175 विधानसभा मतदारसंघासाठीही आज मतदान होत आहे.