जादू पडली फिक्की…! पीएम मोदींच्या महाराष्ट्रात ’19 सभा अन् रोड शो’ तरीही, महायुतीचे 15 उमेदवार झाले पराभूत

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एनडीए आणि इंडिया ब्लॉकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. यावेळी भाजपला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. या निवडणुकीत भाजपने 240 जागा जिंकल्या आहे. भाजपला यूपीमध्ये सर्वाधिक जागांचा फटका बसला आहे.
याशिवाय महाराष्ट्रातही भाजपला केवळ ९ जागा मिळाल्या आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात महायुती उमेदवारांसाठी 19 जाहीर सभा आणि रोड शो आयोजित केले होते, त्यापैकी 15 जागांवर NDA उमेदवारांचा पराभव झाला होता. महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वेदट्टीवार म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जिंकले कारण मोदींनी त्यांच्यासाठी कोणतीही जाहीर सभा घेतली नाही. तर उद्धव ठाकरे म्हणाले होते की मोदी जितक्या सभा राज्यात घेतील तितकेच त्यांचे उमेदवार पराभूत होतील. अशात आता राज्यातील निकालानंतर पुन्हा एकदा असा मोदींच्या सभेचा महायुतीतीला किती फायदा झाला असं प्रश्न सध्या चर्चेत आला आहे.
2014 आणि 2019 च्या निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात मोठे यश मिळाले होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मोठे आव्हान अपेक्षित होते. त्यामुळे पीएम मोदींनी स्वतः महाराष्ट्रात 19 सभा आणि रोड शो केला, पण इतक्या सभा घेऊनही महाराष्ट्रात भाजपला केवळ 9 जागा जिंकता आल्या, तर महायुतीला केवळ 17 जागा जिंकता आल्या. इतकेच नाही तर मुंबईतील घाटकोपरमध्ये पंतप्रधान मोदींनी ज्या मतदारसंघातून रोड शो केला होता, त्या मतदारसंघातूनही भाजपचे उमेदवार पराभूत झाले.
पंतप्रधान मोदींनी मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये 6 मतदारसंघांसाठी जाहीर सभा घेतली, मात्र मुंबईतही त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. येथे फक्त दोन जागा एनडीएच्या वाट्याला गेल्या. त्यात एक भाजपने तर दुसरा शिवसेनेने (शिंदे गट) जिंकली. ज्या उमेदवारांसाठी पीएम मोदींची जादू चाललेली दिसतेराज्यातील पुणे येथे मुरलीधर मोहोळ आणि साताऱ्यात उदयनराजे भोसले यांचा समावेश आहे. जाऊन घेऊया राज्यात भाजपचा प्रभाव कुठल्या जागांवर झाला.
चंद्रपूर – पंतप्रधान मोदींनी भाजपचे उमेदवार आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची चंद्रपुरात जाहीर सभा घेतली, मात्र मुनगंटीवार यांचा 260406 लाख मतांनी पराभव झाला. येथून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. त्यांना 718410 मते मिळाली.
रामटेक- पंतप्रधान मोदींची रामटेकमध्ये शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार राजू पारवे यांच्यासाठी त्यांनी ही जाहीर सभा घेतली, मात्र येथे राजू पारवे यांचा ७६,७६८ हजार मतांनी पराभव झाला. येथून काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे निवडून आले.
वर्धा- पंतप्रधान मोदीं भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्यासाठी ही जाहीर सभा घेतली, मात्र येथे रामदास तडस यांना 81648 हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला. येथून राष्ट्रवादीचे अमर काळे (शरद पवार) विजयी झाले.
नांदेड आणि परभणी – पंतप्रधान मोदींची नांदेड आणि परभणीतमध्ये जाहीर सभा झाली. त्यांनी ही जाहीर नांदेडमध्ये सभा खासदार आणि भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांच्यासाठी आयोजित केली होती, मात्र येथे त्यांना 59442 हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला. येथून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण निवडून आले.
तर परभणीत भर सभेत माझा छोटा भाऊ म्हणून म्हंटले एनडीएने रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांचा देखली १३४०६१ लाख मतांनी पराभव झाला.
कोल्हापूर – पंतप्रधान मोदींची 27 एप्रिल रोजी कोल्हापुरात जाहीर सभा होती, त्यांनी ही सभा खासदार आणि शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार संजय मंडलिक यांच्यासाठी आयोजित केली होती, मात्र येथे त्यांना 154964 लाख मतांनी पराभव स्वीकारावा लागला. येथून काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती निवडून आले. त्यांना 754522 मते मिळाली, तर संजय मंडलिक यांना 599558 मते मिळाली.
सोलापूर – पंतप्रधान मोदींनी सोलापुरातही जाहीर सभा घेतली, ही सभा भाजपचे उमेदवार राम सातपुते यांची होती, मात्र येथे राम सातपुते यांचा 74197 हजार मतांनी पराभव झाला. येथून काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे निवडून आल्या. त्यांना 620225 मते मिळाली, तर राम सातपुते यांना 546028 मते मिळाली.
सातारा – सातारा लोकसभा मतदारसंघासाठी पंतप्रधान मोदी यांची कराडमध्ये जाहीर सभा झाली. भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यासाठी त्यांनी ही जाहीर सभा घेतली. जिथे भाजपला फायदा झाला. कारण येथून उदयनराजे 32771 मतांनी विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादीचे (शरद पवार) पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा पराभव केला आहे.
पुणे – पंतप्रधान मोदींचीही पुण्यात जाहीर सभा झाली. भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती, त्याचा फायदा मोहोळ यांना झाला. पुणे मतदारसंघात मोहोळ यांना ५८४७२८ तर काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांना ४६१६९० मते मिळाली.
माढा – माढा लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान मोदींची जाहीर सभा झाली, त्यात भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा 120837 लाख मतांनी पराभव झाला. येथून राष्ट्रवादीचे (शरद पवार) उमेदवार धरशील मोहिते-पाटील निवडून आले. त्यांना 622213 मते मिळाली, तर रणजित सिंह यांना 501376 मते मिळाली.
धाराशिव – पंतप्रधान मोदींची धाराशिव (उस्मानाबाद) येथे जाहीर सभा झाली. राष्ट्रवादीच्या (अजित पवार) उमेदवार अर्चना पाटील यांच्यासाठी त्यांनी ही सभा घेतली, मात्र येथे त्यांना 329846 लाख मतांनी पराभव स्वीकारावा लागला. येथून शिवसेनेचे (ठाकरे गट) उमेदवार ओमराज निंबाळकर निवडून आले. त्यांना 748752 मते मिळाली, तर अर्चना पाटील यांना 418906 मते मिळाली.
लातूर – पंतप्रधान मोदींची लातूरमध्ये जाहीर सभा झाली. ही सभा भाजपचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांची होती, मात्र मोदींच्या सभेचा श्रृंगारे यांना काहीच फायदा झाला नाही, कारण येथे त्यांचा काँग्रेसच्या शिवाजी काळगे यांच्याकडून 61881 हजार मतांनी पराभव झाला. लातूर मतदारसंघात काळगे यांना ६०९०२१ तर सुधाकर श्रृंगारे यांना ५४७१४० मते मिळाली.





