– माधव विद्वांस
नोबेल पारितोषिक विजेते रासायनिक युद्धाचे जनक फ्रिट्झ हेबर यांचा आज जन्मदिन. फ्रिट्झ हेबर यांना मानवी इतिहासातील सर्वात महत्वाचे शास्त्रज्ञ आणि औद्योगिक रसायनशास्त्रज्ञ म्हटले जाते.त्यांचा जन्म ब्रेस्लाऊ, प्रशिया किंगडम (आता व्रोकला, पोलंड) येथे एका समृद्ध ज्यू कुटुंबात झाला. फ्रिट्झ हेबर, हे सिगफ्राइड आणि पॉला हेबर यांचे चिरंजीव होते. फ्रिट्झ हेबर यांचे वडील सिगफ्राइड हे शहरातील एक सुप्रसिद्ध व्यापारी होते व त्यांचा रंगद्रव्ये, पेंट्स आणि फार्मास्युटिकल्स मध्ये स्वतःचा व्यवसाय होता.
त्यामुळे फ्रिट्झ हेबर यांना रसायन शास्त्राची गोडी बालपणातच लागली.त्यांच्या आईचा फ्रिट्झच्या जन्मानंतर तीन आठवड्यांनंतर मृत्यू झाला, त्यामुळे तिचे पती सिगफ्राइड व्यतिथ झाले होते.फ्रिट्झ हेबर यांच्या काकूने त्यांचा 6 वर्षे त्यांचा सांभाळ केला.त्यांतर त्यांचे वडिलांनी हेडविग हॅम्बर्गरशी पुनर्विवाह केला.हेबरने त्याची सावत्र आई आणि सावत्र बहिणींशी जवळचे नाते निर्माण केले.
त्यांचे प्राथमिक शिक्षण एकत्रितपणे कॅथोलिक, प्रोटेस्टंट आणि ज्यू विद्यार्थ्यांना शिक्षण देणार्या जोहानियम नावाच्या शाळेत पार पडले.हेबरने सप्टेंबर वर्ष 1886 मधे मध्ये ब्रेस्लाऊ येथील सेंट एलिझाबेथ हायस्कूलमध्ये यशस्वीरित्या परीक्षा उत्तीर्ण केली.त्यांतर हेडलबर्ग विद्यापीठात प्रवेश घेतला व रॉबर्ट बनसेनच्या हाताखाली अभ्यास केला.त्यांतर नंतर ते बर्लिनला, शार्लोटेनबर्गच्या टेक्निकल कॉलेजमध्ये (सध्या बर्लिनचे तांत्रिक विद्यापीठ) प्रवेश घेतला.वर्ष 1889 मधे हेबर सहाव्या फील्ड आर्टिलरी रेजिमेंटमध्ये भरती झाले,आणि त्यांची एक वर्षासाठी स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी विद्यापीठ सोडले. प्रतीनियुक्ती संपल्यावर ते चार्लोटेनबर्ग येथे आले.व कार्ल लिबरमनचे शिष्य झाले.
दरम्यान हेबर यांनी यावेळेस रसायनशास्त्रात पीएचडी प्राप्त केली होती, परंतु उत्पादनासाठी कंपनीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी परत वडिलांचेकडे परतले.हेबरन यांनी त्याच्या वडिलांना नैसर्गिक रंगातून कृत्रिम रंगांमध्ये बदलण्याची विनंती केली, सुरवातीस वडिलांनी नकार दिला.अखेरीस त्यांच्या वडिलांनी सिंथेटिक रंगास मान्यता दिली.मात्र कॅल्शियम हायपोक्लोराइट खरेदी करणे व वापरणे यावर मतभेद झाले व ते जेना विद्यापीठात लुडविग नॉरचे स्वतंत्र सहाय्यक म्हणून 1892 मध्ये रुजू झाले.जेना येथे असताना, हेबरने ज्यू धर्मातून ल्युथेरीझम(प्रोटेस्टंट) पंथ स्वीकारला, कारण त्यांना चांगले शैक्षणिक किंवा लष्करी पद मिळण्याची अशा होती.
कार्लस्रुहे विद्यापीठात वर्ष 1894 ते 1911या कालावधीत, हेबर आणि त्यांचे सहाय्यक रॉबर्ट ले रॉसिग्नॉल यांनी हॅबर-बॉश प्रक्रियेचा शोध लावला, ज्यामध्ये उच्च तापमान आणि दाबाच्या परिस्थितीत हायड्रोजन आणि वातावरणातील नायट्रोजनपासून अमोनियाची उत्प्रेरक निर्मिती होते.त्यानंतर मोठ्या प्रमाणात अमोनिया उत्पादनाची प्रक्रिया आणखी विकसित करण्यासाठी, हेबर उद्योगाकडे वळले.कार्ल बॉशसोबत भागीदारी करून, अमोनियाचे व्यावसायिक प्रमाण तयार करण्यासाठी प्रक्रिया यशस्वीरित्या वाढविण्यात आली.
हेबर-बॉश प्रक्रिया औद्योगिक रसायनशास्त्रातील एक मैलाचा दगड ठरले.खत आणि रासायनिक फीडस्टॉक्स सारख्या नायट्रोजन-आधारित उत्पादनांचे उत्पादन, जे पूर्वी मर्यादित नैसर्गिक ठेवींमधून मिळणार्या अमोनियावरव अवलंबून होते, आता ते नायट्रोजन वापरून शक्य झाले आहे.
तसेच नायट्रोजन-आधारित खतांच्या मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याच्या क्षमतेमुळे जगातील निम्म्या लोकसंख्येला आधार ठरले आहे.हेबर यांना या कामासाठी रसायनशास्त्रातील 1918 चे नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.29 जानेवारी 1934 रोजी त्यांचे बाझेल, स्वित्झर्लंड येथे निधन झाले.त्यांच्या पश्चात दुर्दैवाने त्यांनी शोध केलेल्या रासायनिक सूत्रांचा वापर करून नाझींनी ज्यूंची कत्तल केली हि एक शोकांतिका आहे.