मुंबई – घरामध्ये सध्या सुरू असलेल्या टास्कमध्ये विशाल आणि मीरामध्ये वादाची ठिणगी पडली. टास्क दरम्यान मीनल मीराला असं काही बोलून गेली की तिथपासून या भांडणाला सुरुवात झाली. विशालचे त्यावर म्हणणे होते अगदी बरोबर बोली मीनल.
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये विशाल आणि मीरा एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. मीनल म्हणता म्हणता म्हणून गेली, लई फेमस आहे किडे करायला तिचं नावं आहे मीराबाई. मीरा त्यावर म्हणाली खोटी गोष्ट सांगेन मी नंतर.
त्यावर मीनल म्हणाली, तू काय म्हणालीस भोपळ्याचं मी बोलू का ? विशाल म्हणाला पेरफेक्ट बोली आहे …मीराला राग अनावर झाला ती म्हणाली, तू कशाला मध्ये पडतोस सगळ्यांच्या ? प्रत्येक मुलगी बोलायला समर्थ आहे.