नवी दिल्ली – गंगा नदीचे पात्र स्वच्छ ठेवण्यासाठी गंगेच्या उपनद्यांमध्येही आता मर्यादित सांडपाणी जाईल अशी उपाययोजना करण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे.
एका वरीष्ठ सरकारी अधिकाऱ्याने ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सन 2018 मध्ये नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा मध्ये आम्ही या नदीच्या पात्रात कमीतकमी दूषित पाणी जाईल यासाठी प्रयत्न केले.
त्यातून नदीची इकोसिस्टीम कायम राहील आणि या नदीचे पाणी कमीतकमी प्रदुषित होईल असे प्रयत्न आम्ही केले. अशीच उपाययोजना आम्ही आता गंगेच्या उपनद्यांसाठी करण्याच्या विचारात आहोत. त्यात यमुनेसारख्या नदीचाहीं समावेश आहे.
या नद्यांमध्ये अन्य दुषित पाणी मिसळू नये यासाठी काहीं नियमावली निश्चीत केली जात आहे अशी माहिती क्लीन गंगा मिशनचे महासंचालक राजीव रंजन मिश्रा यांनी सांगितली.