नवी दिल्ली – इंधन दरवाढीचा नागरिकांनी निषेध करणे किंवा त्याच्या विरोधात निदर्शने करणे ही आता एक सामान्य बाब झाली आहे. पेट्रोलने प्रतिलिटर १०५ चा आकडा पार केला असून डिझेलही शंभरी गाठण्याच्या तयारीत आहे. यावरून क्रिकटपटूंने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच्यावर टीका केली आहे.
नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालमधील निवडणुकीत क्रिकेटमधून राजकारणात गेलेला आणि पहिल्याच विधानसभा निवडणुकीनंतर मंत्री झालेला क्रिकेटपटू मनोज तिवारी याने इंधन दरवाढीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. तिवारीनं पंतप्रधान मोदींचं 2012 साली केलेलं ट्विट शेअर करत त्यांना प्रश्न विचारला आहे.
पंतप्रधान मोदींनी २०१२ मध्ये गुजराचे मुख्यमंत्री असताना एक ट्विट केलं होतं. त्यात ते म्हणाले होते की, पेट्रोलच्या किमतीमध्ये झालेली भरमसाठ दरवाढ हा युपीए सरकारच्या अपयशाचं मुख्य उदाहरण आहे. त्यामुळे गुजरात राज्यावर मोठा आर्थिक बोजा पडला आहे. हेच ट्विट शेअर करत मनोज तिवारीने त्यांना सवाल केला आहे.
Massive hike in #petrol prices is a prime example of the failure of the @BJP4India led Central Govt.
Amid an ongoing pandemic, this has already put an unimaginable burden on the general public. Yet, Hon’ble PM Shri @narendramodi remains silent!#ModiBabuPetrolBekabu https://t.co/qTf0tszEfc
— MANOJ TIWARY (@tiwarymanoj) July 4, 2021
पेट्रोलच्या किमतीमध्ये झालेली प्रचंड दरवाढ हे भाजप सरकारच्या अपयशाचे उदाहरण आहे. करोना व्हायरसमुळे सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. त्यातच हे संकट…पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर गप्प आहेत. यावेळी मनोज ‘तिवारीने मोदीबाबू पेट्रोल बेकाबू’ असा हॅशटॅगही वापरला.