Manoj Jarange : राज्यात मराठा समाजाच्या (maratha reservation) मागणीच्या आंदोलनाने आक्रमक स्वरूप धारण केले आहे. कारण एका महिन्याची मुदत देऊनही सरकारकडून आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणताही तोडगा काढता आला नाही त्यामुळे पुन्हा एकदा या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील हे बेमुदत उपोषणासाठी बसले आहेत.
त्यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. त्यांची प्रकृती खूपच खालावली असून त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. आता तर त्यांना धड उभही राहता येत नाहीय. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) स्टेजवरच कोसळले. त्यावेळी त्यांना आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या दोघांनी सावरलं आणि आधार दिला.
जालन्याच्या अंतरावाली-सराटी गावात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांचा आमरण उपोषण सुरु आहे. त्यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अन्न-पाणी सोडलय. त्याचा गंभीर परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झालाय.