मुंबई – ‘पुढचं पाऊल’ मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. (Jui Gadkari) या मालिकेमुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली. या मालिकेतील तिची सोज्वळ, आदर्श सूनेची भूमिका प्रेक्षकांच्याही चांगलीच पसंतीस पडली होती. मात्र अलीकडे सोशल मीडियावर मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार ट्रोल होताना दिसतात. याचाच सामना आता जुई गडकरीला देखील करावा लागला आहे. मात्र जुईने ट्रोल करणाऱ्याला सडेतोड उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले आहे.
जुई सोशल मीडियावर सक्रीय असते. अनेक अपडेट ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. याशिवाय तिचे काही फोटोशूटही नेहमीच ती इनस्टाग्रामवर शेअर करताना दिसते. असेच सुंदर साडीतील काही फोटो जुईने इनस्टाग्रामवर शेअर केला होता. यात एका फोटोत ती ती जमिनीवर बसलेली दिसत आहे. त्यावर नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले की, “फोटो चांगला आहे. पण खाली का बसला आहात?” त्या कमेंटला जुईनेही चोख उत्तर दिलं. तिने लिहिलं, “माणसाने नेहमी जमिनीवरच राहावं.”
View this post on Instagram
जुईने दिलेल्या या उत्तराने सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या या सडेतोड उत्तराला चाहत्यांनीही सहमती दर्शवली आहे. जुई गडकरीच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, तिने ‘माझीया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तुजविण सख्या रे’, ‘पुढचं पाऊल’ या मालिकांमध्ये काम केले आहे.