मुंबई – मलायका अरोरा फिटनेस क्वीन सोबतच स्टायलिश देखील आहे. रोज नवीन काहीना काही स्टायलिश करणाऱ्या मलायकाची प्रत्येक गोष्ट व्हायरल होते. मलायकाच्या प्रत्येक पोस्टवर तिच्या फॅन्सच बारीक लक्ष असत. तीन कानात घातलेल्या हेअर रिंग्स पासून ते जिमला प्रोटीन शेक घेऊन जाणाऱ्या बॉटल पर्यंत सर्व काही चाहत्यांच्या बरोबर लक्षात राहत. नुकतीच मलायकाने केलेली एक स्टाईल चांगलीच चर्चेत आली आहे.
मलायका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. जिथे जाईल तिथून ती आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले. अलीकडेच मलायका मुंबई विमानतळावर स्पॉट झाली होती जिथून तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी मलायका नेहमीप्रमाणेच स्टायलिश दिसत होती. तिने एअरपोर्ट लूकसाठी ब्लू रिप्ड जीन्ससह काळ्या रंगाचा स्वेटर घातला होता. मात्र, सर्वांच्या नजरा मलायका अरोराच्या स्वेटरवर बनवलेल्या हातावर जात होत्या. तिच्या काळ्या स्वेटरवर गोल्ड कलरचा हात आहे, जो तिच्या आउटफिटला अधिक स्टायलिश लुक देत होता.
मलायका अरोरा नेहमीच तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. मलायका तिच्या हॉटनेसने सोशल मीडियाचे तापमान वाढवत असते. कधी साडी तर कधी गाऊन परिधान करून मलायका आग लावते. यावेळीही मलायकाने घातलेल्या स्टायलिश जीन्समुळे ती लक्षवेधी ठरली. जीन्स मोठ्या प्रमाणात फाटलेली असल्यामुळे तर चाहत्यांनी भरमसाठ सल्ले देत तिच्या फॅशन सेन्सवर कमेंट केल्या आहेत.