मुंबई – भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर नवीन चित्रपट येणार असून निर्मात्यांनी जेव्हा या चित्रपटाची घोषणा केली होती, तेव्हा पासूनच हा चित्रपट चर्चात राहिला आहे. ‘मैं अटल हूं..’ असे या चित्रपटाचे नाव आहे.
बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहे. तसेच या बायोपिकसाठी पंकज यांनी त्यांचा पहिला लूक शेअर देखील काही महिन्यांपूर्वी शेअर केला होता.
हा चित्रपट भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आणि राजकीय कारकिर्दीभोवती फिरणार आहे, जे केवळ राजकारणी नव्हते तर कवी, सज्जन आणि राजकारणी देखील होते. सिनेमाचे शूटिंग देशातील अनेक भागांमध्ये झाले आहे.
नुकतंच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून, अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी आपला अनुभव चाहत्यांशी शेअर केला आहे. त्यांनी आपल्या इन्टाग्रामवर या संदर्भातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. मराठमोळा दिग्दर्शक रवी जाधव याने सिनेमाची संपूर्ण धुरा सांभाळी आहे.
पंकज यांनी त्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “अटलजी यांच्यासोबतचा प्रवास, ती यात्रा खूप काही देऊन जाणारी आहे. खूप काही शिकवून जाणारी आहे. प्रेरणादायी प्रवास होता हा,
अटलजी यांचे व्यक्तिमत्व कमालीचे प्रभावी होते. त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट तयार करण्याची संधी मिळते आहे हीच खूप मोठी गोष्ट आहे.’ अशी भावना अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी व्यक्त केली आहे.