उदगीर मधील ‘विक्रम बोळेगावे’ यांनी दिग्दर्शीत केलेल्या ‘महासत्ता’ लघुपटाला अहमदनगर येथील १५व्या प्रतिबिंब राष्ट्रीय लघुपट व माहितीपट महोत्सवामध्ये,खुल्या गाटात सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाल्याने लातूर जिल्हाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या महोत्सवामध्ये ‘सर्वोत्कृष्ट संकलन’, ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन’ व ‘सर्वोत्कृष्ट लाघुचित्रपट’ या पुरस्काराचा समावेश आहे. या आधी नोव्हेंबर २०२१ मध्ये झालेल्या ‘ग्राम विकास मंत्रालय भारत सरकार’ च्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, देशातून सर्वोत्कृष्ट लघुचित्रपटाचा यादीत तीसरा मनाचा पुरस्कारावर मोहर उमटवली आहे.
‘महासत्ता’ हा ग्रामीण भागातील समस्या, सामाजिक जडन-घडन या गोष्टीवर प्रकाश टाकणारा लघुपट आहे. हा लघुपट व्यवहारिक आयुष्याची टीप्पनी करत वास्तवाशी भान करून देतं. विविध अंगाने सामाजिक-आर्थिक आणि राजकीय बाजूवर प्रकाश टाकत एका परंपरेगत चालू आलेल्या व्यवस्थेला जागं करतं. या चित्रपटाचे चित्रीकरण लातूर जिल्ह्यातील उदगीर शहराच्या सभोवताली पार पाडले. मागासलेल्या भागाचे वास्तवदर्शी चित्रीकरण करून, सत्ते वर असलेल्या व्यवस्थेला प्रश्न विचारणारा हा लघुपट आहे. ‘महासत्ता’ ला आतापर्यंत वेगवेगळ्या राष्ट्रीय व अंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये पाच पुरस्कार प्राप्त झाले आहेत.या मध्ये ६वे उदगीर अंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा ही समावेश आहे.
या मध्ये ‘विवेक खतगावकर’, ‘राम गोविंदवाड’, ‘अमृता चिद्री’, ‘सुरेश कुंभार’, ‘विलास हसबे’ ‘वीर आढे’, ‘मोहन विश्वभ्रम्हा’
यांनी प्रमुख भूमिका स्वीकारल्या आहेत, तर संवाद व पटकथा ‘स्वप्नील मुंगे’ यांनी लिहिली असून छायाचित्रण ‘आकाश बनकर’ ‘भारती गुंड’ यांनी केले तसेच वेशभूषाकार ‘शिवाजी करडे’ यांनी केले. चित्रपटाचे संकलन ‘प्रदीप पाटोळे’ ध्वनी मुद्रण ‘राघव पुरी’ व निर्मिती व्यवस्थापन ‘सतीश गोविंदवाड’ यांनी केले. आणि कथा व दिग्दर्शनाची धुरा ‘विक्रम बोळेगावे’ यांनी सांभाळली आहे.