“महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा”; भाजप आणि महायुतीच्या यशानंतर PM मोदींनी मराठीतून मानले आभार

PM Narendra Modi | महाराष्ट्रातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्रात विविध कारणांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही वर्षांपासून प्रलंबित होत्या. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 2017 नंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी झाली. या स्थानिक निवडणूकीतही महायुतीने विरोधकांचा धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट करत महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत.
पंतप्रधान मोदींनी दिल्या मराठीतून शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रिट्वीट करत मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत. “महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपा आणि महायुतीवर विश्वास दाखवल्याबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेचा ऋणी आहे. आमच्या लोक-केंद्रित विकासाच्या दृष्टीकोनावर जनतेने दाखवलेल्या विश्वासाचे हे प्रतिबिंब आहे. आम्ही राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नव्या ऊर्जेने काम करण्यासाठी वचनबद्ध आहोत. भाजपा आणि महायुतीच्या तळागाळापर्यंत मेहनत घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मी कौतुक करतो,” असे मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हणत आभार मानले आहेत. PM Narendra Modi |
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपा आणि महायुतीवर विश्वास दाखवल्याबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेचा ऋणी आहे. आमच्या लोक-केंद्रित विकासाच्या दृष्टीकोनावर जनतेने दाखवलेल्या विश्वासाचे हे प्रतिबिंब आहे. आम्ही राज्यातील प्रत्येक… https://t.co/X5jmfpb3M8— Narendra Modi (@narendramodi) December 21, 2025
अमित शाहांनीही केले अभिनंदन
तर दुसरीकडे अमित शाह यांनी म्हंटले की, “महाराष्ट्र नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकीत महायुतीला प्रचंड समर्थन दिल्याबद्दल राज्यातील जनतेचे आभार. हा विजय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारांच्या जनकल्याणकारी योजनांवर जनतेने दिलेला आशीर्वाद आहे.” यावेळी अमित शाह त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, राज्यात भाजपचे ३,३०० पेक्षा जास्त नगरसेवक, तर १३४ नगराध्यक्ष थेट निवडून आले आहे. एकूण निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी तब्बल ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपचे आहे. . नगरसेवकपदावर भाजपने नवा रेकॉर्ड केला. यापूर्वीच्या २०१७ च्या निवडणुकीत भाजपचे १६०२ नगरसेवक होते, आता त्याच्या दुपटीचे ३३०२ नगरसेवक आहेत. या निकालाने भाजप हा महाराष्ट्रातील नंबर १ पक्ष असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याचे सांगितले. तसेच जया ठिकाणी आम्हाला यश मिळाले नाही, तिथेही आम्ही पूर्ण ताकदीने विकासकामे करू, असे आश्वासन देखील फडणविसांनी दिले. PM Narendra Modi |
हेही वाचा:





