Chandrapur News | चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिला आहे. ११ पैकी ७ ठिकाणी काँग्रेसने बाजी मारली. तर भाजपला केवळ दोन ठिकाणी समाधान मानावे लागले. एक जागा शिंदेसेनेने तर एक भाजप बंडखोर अपक्षाने जिंकली. या पराभवानंतर पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी थेट पक्षाच्या नेतृत्वावर टीका केली. पक्षाने माझी शक्ती कमी केली, असे म्हणत मुनगंटीवार यांची नाराजी व्यक्त केली. “काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना शक्ती दिली. आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली. चंद्रपूर जिल्ह्याला मंत्रिपद देण्यात आले नाही. सोबतच गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया चार जिल्ह्यांत एकही मंत्रिपद नाही. ऐन निवडणुकीत अन्य पक्षांच्या नेत्यांना भाजपात प्रवेश देण्यात आला. या जिल्ह्यामध्ये गटबाजीला पोषक वातावरण तयार होईल, असे आमच्या पक्षाच्या धोरणामध्ये दिसले,” असे मुनगंटीवार म्हणाले. Chandrapur News | सुधीर भाऊंना कुठली ताकद कमी पडली असेल तर… यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका मांडली. “आज पक्षाने काही प्रवेश दिले असतील तर त्याचा फायदाच झालेला आहे. समजा जर सुधीर भाऊंना कुठली ताकद कमी पडली असेल तर त्याची भरपाई आम्ही महापालिका निवडणुकीत देऊ. पूर्ण ताकद देऊन चंद्रपूरची महापालिका निवडणूक जिंकून आणू”, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. Chandrapur News | हेही वाचा: “मग हे जिंकले कसे?” उबाटाच्या सवालापासून ते वैभव मांगलेच्या छोट्या पडद्यावरील एन्ट्रीपर्यंतच्या टॉप १० बातम्या वाचा एका क्लिकवर