स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात मोठी अपडेट; राज्य निवडणूक आयोगाकडून महत्वाची माहिती जारी, वाचा सविस्तर…

Local body elections : लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. सर्वेाच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा आणि महापालिकांच्या निवडणुका पुढच्या वर्षी म्हणजेच 30 जानेवारी २०२६ च्या आतमध्ये घेण्याचे आदेश दिले आहेत. आता या निवडणुकासंदर्भात अत्यंत महत्वाची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
राज्यातील 32 ZP आणि 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये कालवधी ठरवून देण्यात आला आहे. त्यानुसार प्रारुप मतदार यादीवर 8 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे. त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे. जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आली आहे.
राज्यातील ३२ जिल्हा परिषदा व ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आज मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार प्रारुप मतदार यादीवर ८ ते १४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील.
राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ हा… pic.twitter.com/bNqyiHvFfu
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 23, 2025
त्यावर १४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. अंतिम मतदार यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी २७ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर केली जाईल, असंही सांगण्यात आलं आहे. यामुळे आता निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी हरकती व सूचना मागविल्या असल्याने राज्यात महापालिका निवडणूका त्यानंतर होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
या माहितीनुसार, झेडपी व पंचायत समितीच्या निवडणुका नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबर महिन्यात होऊ शकतात, असा अंदाज आहे. तसेच याच कालावधीत महापालिका निवडणुकांसाठी मतदारयादीवर हरकती व सूचना मागवल्या जाऊ शकतात. निवडणुकांचे वेळापत्रकही याचदरम्यान जाहीर होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.





