Lok Sabha Election 2024 । भाजपने बुधवारी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ७२ उमेदवारांची दुसरी यादी जारी केली. त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा समावेश आहे. भाजपने याआधी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत गडकरी यांचे नाव नसल्याचे भुवया उंचावल्या गेल्या होत्या. मात्र, त्या पक्षाने दुसऱ्या यादीत गडकरी यांना स्थान देताना महाराष्ट्रातील अनेक जागांचा सस्पेन्स संपवला. अशात डॉ. सुजय विखे पाटील यांना अहमदनगरमधून उमेदवारी देण्यात आली.
अशात अहमदनगरमधून अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके सुद्धा लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याच्या चर्चा गेल्या काही काळापासून रंगल्या होत्या. अशात महायुतीकडून भाजप पक्षातील डॉ. सुजय विखे पाटील यांना अहमदनगरमधून उमेदवारी देण्यात आल्यामुळे आता नीलेश लंके हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे पुन्हा एकदा शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज गुरुवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नीलेश लंके हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे अहमदनगर मतदारसंघात विखे-लंके यांच्यात सामना रंगण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पारनेरचे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार लंके हे महाविकास आघाडीकडून लोकसभेचे उमेदवार असतील, अशी गेल्या काही दिवसांपासून होती. लंके गुरुवारी पुण्यात पुन्हा घरवापसी करत शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पक्ष प्रवेशाचे निरोपही कार्यकर्त्यांना आले आहेत.याबाबत लंके यांनी अधिकृतपणे काहीही घोषणा केलेली नाही. प्रवेशानंतरच ते भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नीलेश लंके हे शरद पवार गटात पुन्हा परततील असं बोललं जात होतं.
हे वाचाल का ? निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा महिला मतदारांवर ‘फोकस’; ‘नारी न्याय’ गारंटी