मंचर – मंचर नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी उभ्या राहिलेल्या अपक्ष उमेदवार प्राची आकाश थोरात यांना प्रचारात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रचार करताना घरोघरी महिला, पुरुष मतदारांकडून त्यांचा मानसन्मान केला जात आहे. गेली अनेक वर्ष मंचर शहरात ताकद असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या बालेकिल्ल्यात संजय थोरात यांच्या रूपाने स्नुषा प्राची थोरात यांनी प्रचारात मुसुंडी मारली. प्राची थोरात यांना मतदारांचा मिळत असलेल्या पाठींब्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले. त्यांनी एक आव्हानच उभे केले असल्याची चर्चा मंचर शहरात आहे. मंचर शहर व परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या संजय थोरात यांच्या स्नूषा प्राची थोरात या नगराध्यक्ष पदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात असून संजय थोरात यांनी गेल्या १० वर्षात केलेल्या विविध विकास कामे, सामाजिक कार्याच्या जोरावर प्राची थोरात यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मंचर शहर व परिसरात प्रचार करताना घरोघरी त्यांचा मानसन्मान केला जात आहे. महिला हळदी कुंकू लावून त्यांचे औक्षण करत आहे. प्राची थोरात याच मंचर नगरपंचायतीच्या प्रथम नगराध्यक्ष होणार अशा शुभेच्छा त्यांना घराघरातून मिळत आहे. प्राची थोरात या उच्चशिक्षित, सुसंस्कृत असून मंचर शहरात आकाश दूध उद्योग समूह त्या चालवतात.त्यांच्या उच्च शिक्षणाचा वापर मंचरच्या सर्वांगीण विकासासाठी व्हावा हा विचार करून त्यांचे सासरे संजय थोरात यांनी प्राची थोरात यांना निवडणुकीच्या मैदानात नगराध्यक्ष पदासाठी उतरवले आहे. संजय थोरात गेली १० वर्ष मंचर सर्व परिसरातील नागरिकांसाठी काम करत असून एक कॉल प्रॉब्लेम सॉल,जनता दरबार च्या माध्यमातून नागरिकांच्या विविध समस्या त्यांनी मार्गी लावले आहेत. मंचर आणि तालुक्यातील जवळपास ११ हजार नागरिकांना विविध योजनांचा लाभ,शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. त्यामुळे त्यांच्या स्नूषा प्राची थोरात यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मंचर नगरपंचायत निवडणूकीत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती झाली आहे. शिवसेना शिंदे गट स्वतंत्र लढत आहे. असे असताना देखील संजय थोरात यांच्या कामाच्या जोरावर अपक्ष उमेदवार प्राची थोरात यांना जनतेची पसंती मिळत असल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहे.