बॉलीवूड अभिनेत्री कृती सेनन सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडिओज् सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांची मने जिंकत असती. तिची फॅन फॉलोइंग देखील खूप मोठी आहे.
View this post on Instagram
सध्या मुंबईतील एका रेस्टॉरंटमधील कृती सेननचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बॉलीवूड अभिनेत्री कृति सेनन खास अंदाजात नुकतीच मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये दिसून आली. कृती सेनन आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत डिनरसाठी बाहेर पडली होती.
View this post on Instagram
त्यावेळी ती ग्लॅमरस अंदाजात कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे. नियॉन बॉडी कॉन ड्रेसमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत होती. या फोटोतील तिचा लुक खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे. या फोटोवर चाहत्यांसह सेलेब्रिटीजने देखील कमेंटस् केल्या आहेत.
View this post on Instagram
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास कृति लवकरच आगामी “बच्चन पांडे’ चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता निर्माण झाली आहे.
View this post on Instagram