कृति खरबंदा आणि सम्राट पुलकितमध्ये काही तरी सूत जुळायला लागल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. मात्र आतापर्यंतच्या या गॉसिप चर्चेवर स्वतः कृति खरबंदानेच शिक्कामोर्तब केले आहे. “आमच्या रिलेशनशीपबाबतची चर्चा म्हणजे अफवा नाहीत. आम्ही खरोखरच एकमेकांबरोबर डेटिंग करतो आहोत.’ असे कृति म्हणाली. आमच्या रिलेशनशीपबाबत सर्वात आगोदर आपल्या आई वडिलांना समजावे अशी तिची अपेक्षा होती. या बाबत आपण स्वतःच घरच्यांशी बोलायचे ठरवले होते. प्रत्येक विषय स्वाभाविकपणे बोलण्याचीही एक वेळ यावी लागते. त्याप्रमाणे योग्य वेळेची वाट बघत होते.
सम्राटबरोबरच्या आपल्या रिलेशनशीपला एकूण 5 महिने झाले. मात्र आपण या रिलेशनशीपबाबत खूप खूष असल्याचेही तिने सांगितले. सम्राट पुलकितबरोबर आपले डेटिंग सुरू आहे, हे सांगायला आपल्याला जराही संकोचल्यासारखे होत नाही. उलट ही आनंदाची बातमी आहे, असेच आपल्याला वाटत असल्याचे तिने सांगितले. कृति खरबंदा आणि सम्राटचा पुढच्या सिनेमा “पागलपंती’ काही दिवसांतच सुरू होणार आहे. हे दोघेही जरी एकमेकांबरोबर काम करत असले, तरी त्यांच्या व्यक्तिरेखा प्रत्यक्षात खूपच भिन्न असणार आहेत.