मुंबई – बिग बॉस ओटीटी या रिअॅलिटी शोचा दुसरा सीझन जिंकल्यापासून यूट्यूबर एल्विश यादव चर्चेत आहे. एल्विश यादव हा शोचा ट्रॉफी जिंकणारा पहिला वाईल्ड कार्ड स्पर्धक आहे. त्याने बिग बॉस OTT च्या चमकदार ट्रॉफीसह 25 लाखांची रक्कम जिंकली आहे.
YouTuber एल्विश विजेता झाल्यापासून त्याचे चाहते खूप आनंदी आहेत. अशात एल्विश अचानक त्याच्या लव्ह लाईफमुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. रिपोर्ट्सनुसार कीर्ती मेहरा ही एल्विशची गर्लफ्रेंड असल्याचे सांगितले जात होते. मात्र आता अलीकडेच YouTuber ने त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल खुलासा केला आहे. कीर्ती मेहरा त्याची गर्लफ्रेंड नसल्याचे एल्विशने सांगितले आहे. त्याची गर्लफ्रेंड सोशल मीडियापासून दूर राहते.
एल्विश एक मुलाखतीत सांगितले, “मी ज्या मुलीला लाईक करतो ती वेगळी आहे. ती सोशल मीडियावर नाही, ती पंजाबची आहे आणि तिथे राहते. आमचं आयुष्य खूप खाजगी आहे. तिला प्रत्येक गोष्ट खाजगी ठेवायची आहे. मी कुठेही माझ्या गर्लफ्रेंडच नाव घेतले नाहीये किंवा घेतलेले तिला आवडणार नाही. ती या सर्व गोष्टींपासून दूर आहे. मी तिच्याशी नात्यात सिरिअस आहे.” असं म्हणत त्याने आपल्या पर्सनल लाईफबाबत खुलासा केला.