मुंबई – भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांची आक्षेपार्ह कथित व्हिडीओ क्लिप एका वृत्तवाहिनीने प्रसारित केल्यानंतर राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली. या व्हिडीओत आक्षेपार्ह स्थितीत सोमय्या दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन सुरु असून विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला आहे. अशात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या व्हिडीओ क्लिपबाबत भाष्य केलं आहे.
विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे तसेच ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी सोमय्या प्रकारावरून चौकशीची मागणी केली. अंबादास दानवे यांनी सभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे पेन ड्राइव्ह सुपूर्त करत सर्व प्रकरणामागचे सत्य समोर यावे अशी मागणी करत गृहमंत्र्यांनी याबाबत खुलासा करावा अशी देखील मागणी केली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सखोल आणि उच्च स्तरीय चौकशी करणार असल्याचे स्पष्ट केले.
“राजकारणात अनेकवेळा असे प्रसंग येत असतात ज्यामुळे माणसाचं पूर्ण राजकीय आयुष्य आणि केलेली पुण्याई पणाला लागते. समोर आलेल्या प्रकरणातील काही तक्रारी असतील, तर त्याची चौकशी आम्ही करू असं फडणवीस यावेळी म्हणाले. तसेच संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही अशी ग्वाही देखील फडणवीसांनी सभागृहात बोलताना दिली.
किरीट सोमय्यांचं फडणवीसांना पत्र
एका वृत्तवाहिनीवर माझी व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, अशा अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहे, अनेक महिलांच्या तक्रारी आहेत असे दावे केले जात आहेमाझ्याकडून कोणत्याही महिलेवर अशा अत्याचार झालेला नाही. अशा आरोपांची व्हिडिओची सत्यता तपासावी चौकशी करावी अशी देवेंद्र फडणवीस यांना विनंति असे ट्विट सोमय्या यांनी घडलेल्या सर्व प्रकरणानंतर केले आहे.
एका वृत्तवाहिनीवर माझी व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, अशा अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहे, अनेक महिलांच्या तक्रारी आहेत असे दावे केले जात आहे
माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अशा अत्याचार झालेला नाही
अशा आरोपांची व्हिडिओची सत्यता तपासावी चौकशी करावी @Dev_Fadnavis यांना विनंति pic.twitter.com/Q1YLoP0ZUi— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 18, 2023