मुंबई – आजकाल सिनेमांमध्ये हॉट सीन्स असणे ही सामान्य गोष्ट झाली आहे. पण गेल्या काही वर्षांपासून याच हॉट अँड बोल्ड सीन्स चा उपयोग सिनेमा हिट करण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. सिनेमागृहात अश्या प्रकारचे सीन्स दाखविण्यावर काही मर्यादा येतात.
मात्र, ओटीटी प्लॅटफॉर्मवर बोल्ड सीन्सचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. ओटीटीवर अश्या अनेक वेब सिरीज आणि चित्रपट चर्चेत राहिले. तर, काही अभिनेत्री अश्या आहेत ज्या वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन्स देऊन प्रकाश झोतात आल्या आहेत. आणि याच अभिनेत्रींन विषयी आज आपण जाणून घेणार आहोत…
या यादीत सर्वात प्रथम नंबर येतो तो म्हणजेच, ऑल्ट बालाजीची अडल्ट वेब सीरीज ‘गंदी बात’चा या सिरीज मध्ये अभिनेत्री ‘फ्लोरा सैनी आणि अन्वेशी जैन’ यांनी लेस्बियनच्या भूमिकेत बोल्ड सीन्स दिले होते. या दोघींच्या या बोल्ड दृश्यांवरून बराच गदारोळ झाला होता.
लस्ट स्टोरीमधील बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री ‘कियारा अडवाणी’चा बोल्ड सीन बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होता. तिचा हा सीन्स चांगलाच व्हायरल सुद्धा झाला होता. या वेब सिरीज मध्ये अभिनेता विकी कौशल आणि नेहा धुपिया दिसून आले होते.
बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल याची ‘आश्रम’ वेब सिरीज सर्वांनाच माहिती आहे. या सीरिजचे दोन सीजन येऊन गेले आहेत. अतिशय लोकप्रिय वेब सीरिजमधील ‘त्रिधा चौधरी’चे बोल्ड सीन्स खूप चर्चेत होते.
अभिनेत्री ‘रसिका दुग्गल’ही मिर्झापूरमधील तिच्या बोल्ड सीन्समुळे बरीच चर्चेत आली होती. तर अभिनेत्री सयानी गुप्ता पहिल्यांदाच फोर मोअर शॉट्समध्ये बोल्ड सीन देताना दिसली होती. तसेच, रागिनी एमएमएस फेम अभिनेत्री करीश्मा शर्मा तिच्या बोल्ड सिन्समुळे नेहमीच चर्चेत असते.
दरम्यान, अश्या बऱ्याच वेब सिरीज आणि सिनेमांमध्ये बोल्ड सिन देऊन या अभिनेत्री रातोरात प्रकाश झोतात आल्यात आहेत. सोशल मीडियावर सुद्धा या अभिनेत्रींचे लाखोंच्या संख्येत फॉलोवर्स आहेत. फॅन्स सुद्धा त्यांच्या फोटो आणि व्हिडिओला चांगलीच पंसती देतात.