अकलूज – माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायतीतील सरपंच पदासाठी दि. १८ डिसेंमबर रोजी मतदान होणार त्यानुसार गावागावात रणधुमाळी सुरु झाली आहे. खंडाळी – दत्तनगर ग्रामपंचायतीसाठी सत्ताधारी, विरोधी तरुण गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. तसेच तिसरी आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका सध्या तरी गुलदस्त्यात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा येणार या निर्णयावर ठाम असलेल्या इच्छुकांची उमेदवार शोधण्यासाठी घालमेल सुरू झाली आहे. परंतु खंडाळीची जनता तरुणाईच्या हाती सूत्रे देणार का?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या खंडाळी गावामध्ये ६ वॉर्ड असून ३११७ पुरुष आणि २७५६ स्त्री असे एकूण ५८७३ एवढे मतदार आहेत. खंडाळी-दत्तनगर ग्रामपंचायतीसाठी सरपंचपद अनुसूचित जाती स्त्रीसाठी आरक्षित आहे.
वॉर्ड क्र. १ मध्ये नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वॉर्डमध्ये एकूण ८३४ मतदार आहेत.
वॉर्ड क्र. २ मध्ये अनुसूचित जाती स्त्री, नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग स्त्री आणि सर्वसाधारण असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वॉर्डमध्ये एकूण ८४७ मतदार आहेत.
वॉर्ड क्र. ३ मध्ये अनुसूचित जाती स्त्री आणि सर्वसाधारण असे दोन सदस्य आरक्षित आहेत. या वॉर्डमध्ये एकूण ६६२ मतदार आहेत.
वॉर्ड क्र. ४ मध्ये सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वॉर्डमध्ये एकूण ११४६ मतदार आहेत.
वॉर्ड क्र. ५ मध्ये अनुसूचित जाती, नागरिकांचा मागासप्रवर्ग आणि सर्वसाधारण स्त्री असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वॉर्डमध्ये एकूण ११८० मतदार आहेत.
वॉर्ड क्र. ६ मध्ये अनुसूचित जाती, नागरिकांचा मागासप्रवर्ग आणि सर्वसाधारण स्त्री असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वॉर्डमध्ये एकूण १२०४ मतदार आहेत.
सध्या इच्छुक तरुणांनी सत्ताधाऱ्यांना शह देण्यासाठी कागदपत्रे जुळवणी करत आपली दमदार पायाभरणी सुरू केली आहे. त्यानुसार सोशल मीडियावर आपल्या उमेदवारीच्या वलग्ना कायम ठेवल्या आहेत. परंतु कोण होणार किंगमेकर हे मात्र 20 डिसेंबरलाच स्पष्ट होणार आहे.