मुंबई – देशातला सर्वात मोठा रिऍलिटी शो ठरलेला “कौन बनेगा करोडपती 14’ पुन्हा सुरू होणार आहे. या कार्यक्रमाची लोकप्रियता सुरुवातीपासूनच एका उंचीवर राहिली आहे. बॉलीवूडचे शहंशाह, बिग बी, मेगा स्टार ‘अमिताभ बच्चन’ हा रिऍलिटी कॉम्पिटिशन शो घेऊन येणार आहेत.
नुकतंच, “कौन बनेगा करोडपती 14’चा ऑफिशल टिझर प्रदर्शित करण्यात आला असून, या सिझनची नाव नोंदणी देखील सुरु झाली आहे. बिग बींचं सूत्रसंचालन आणि कार्यक्रमाचं एकंदर स्वरुप पाहता गेल्या कैक वर्षांपासून या कार्यक्रमाची लोकप्रियता शिखरावर पोहोचली आहे.
View this post on Instagram
केबीसीच्या 14 व्या पर्वामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला फक्त अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत. बिग बी रात्री 9 वाजता जो प्रश्न विचारतील त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी रात्री 9 वाजेपर्यंत द्यावं लागणार आहे. ज्यांचं उत्तर योग्य असेल त्यांना पुढच्या फेरीसाठी निवडलं जाईल. यंदाचा “कौन बनेगा करोडपती 14’ सिझन उद्या पासून म्हणजेच, 9 एप्रिल रोजी सुरु होणार आहे.