मुंबई – गेल्या आठवड्यात नायका या सौंदर्य प्रसाधनांच्या कंपनीचा आयपीओ शेअर बाजारावर नोंदला गेला. त्यामुळे या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी फाल्गुनी नायर अब्जाधीश झाल्या. त्याचबरोबर आयपीओ येण्यापूर्वी या कंपनीत गुंतवणूक केलेल्या कॅटरिना कैफ आणि आलिया भट्ट या अभिनेत्रीच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसून आले.
कॅटरिना कैफ अभिनेत्रीने या कंपनीत 2018 मध्ये 2.02 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. बुधवारी नायका कंपनीच्या शेअरच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे कॅटरिना कडील 2.02 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीचे मूल्य 22 कोटी रुपयांवर गेले.
आलिया भटचा या कंपनीमुळे जास्तच फायदा झाला आहे. तिने जुलै 2020 मध्ये म्हणजे कॅटरिना कैफनंतर 4.95 कोटी रुपयांची गुंतवणूक नायका कंपनीमध्ये केली होती. बुधवारी जेव्हा या कंपनीच्या शेअरचे भाव वाढले तेव्हा आलियाकडील गुंतवणुकीचे मूल्य 54 कोटी रुपयांवर गेले. या कंपनीत निम्मी गुंतवणूक असलेल्या कंपनीचा संस्थापक फाल्गुनी नायर त्यांच्याकडे आता 5.5 अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे.
अमिताभ बच्चन यांनी अशीच गुंतवणूक जस्ट डायल या कंपनीमध्ये केली होती. 2013 मध्ये जस्ट डायल कंपनीचा आयपीओ बाजारात आल्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 46 पटीने वाढले होते. त्या तुलनेत कॅटरिना कैफ आणि आलिया भट यांच्या गुंतवणूकीच्या मूल्यात 11 पट वाढ झाली आहे. मात्र तीही काही कमी नाही.