अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कपल म्हणून ओळखले जाते. लग्नानंतर विकी कतरिना आपापल्या कामात व्यस्त असल्यामुळे एकमेकांसोबत वेळ घालवू शकले नाही.अशातच दोघेही त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून एकमेकांसोबत आनंदाचे क्षण घालवताना दिसले आहेत. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या रोमँटिक फोटोंची एक झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ज्यामध्ये हे कपल बोटीवर आनंदाचे क्षण घालवताना दिसत आहेत. कतरिनाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ते दोघे मालदीवमध्ये असल्याचे दिसून येत आहे.
अभिनेत्रीने मालदीवमधील हे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये विकी आणि कतरिना एकमेकांसोबत रोमँटिक वेळ घालवताना दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी विकी कौशल आणि कतरिना कैफ एयरपोर्टवर दिसून आले होते. दोघेही एकत्र एका सीक्रेट डेस्टिनेशनवर सुट्टी घालवण्यासाठी गेल्याच म्हटले जात होते.
या फोटोंमध्ये कतरिना कैफ मेकअपशिवाय बिकिनी घातलेली दिसत आहे. तर दुसरीकडे विकी कौशल शर्टलेस स्टाईलमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. सुंदर छायाचित्रे शेअर करताना अभिनेत्रीने तिच्या कॅप्शनमध्ये इमोजी शेअर केला आहे.