संगमनेर – काही दिवसांपूर्वी करुणा मुंडे यांनी भारत भोसले आणि त्यांचे सहकाऱ्यांनी फसवल्याचा गुन्हा दाखल केला होता. आता भोसले यांनीच मुंडे यांच्यावर तब्बल 22 लाख 45 हजारांची तसेच 12 लाखांचे दागिने घेऊन भोसले यांची फसवणूक केल्या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांच्यावर संगमनेर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारत भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून करुणा मुंडे यांनी भोसले यांचा विश्वास संपादन करून नवीन पक्ष उभारणीसाठी 22 लाख 45 हजार आणि 12 लाखांचे सोने घेतले. परंतु ते परत न करता भोसले यांची फसवणूक केली. तसेच “मैं अजय देडे को भेज के तुमको खत्म कर दुगी” अशी धमकी दिली. त्यामुळे शनिवारी (दि 3) रात्री उशिरा करुणा मुंडे यांच्यावर गु र नं 767/2022 अन्वये भा द वि कलम 420, 506 प्रमाणे संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक निकिता महाले या करत आहेत.