जामखेड – व्यायाम करण्यासाठी गेलेल्या तरूणाला विहिरीत काळविट पडल्याचे दिसल्याने त्याला काढण्यासाठी खर्डा येथील युवकांनी जिवाची पर्वा न करता पाच ते सहा परस खोल असलेल्या विहीरीतुन काळविट वाचविल्याने परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.
खर्डा येथील अनिल गोलेकर यांच्या शेतातील विहिरीला कठरा नसल्याने काळविट विहीरीत पडले दरम्यान काही तरुण सकाळी व्यायाम करण्यासाठी गेले असता त्याना विहीरीत डोकावून पाहिले तर त्यांना काळविट पडलेले दिसले. त्यांनी ईश्वर थोरात व क्रांतीवीर अकॅडमीचे विद्यार्थी यांना कळवले त्यानी तातडीने घटनास्थळी पोहोचले त्यांनंतर तेथे गावातील तरुणांची मोठी गर्दी झाली होती. विहिरीतुन काळविट बाहेर काढण्यासाठी थोरत व त्याच्या सहकाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता विहीरीत उतरुन काळविट वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले काळविट पकडण्याचा प्रयत्न करत असतांना ते काळविट त्याच्या शिंगाणे व पायाने हल्ला करण्याचा प्रयत्न करत होते.
अखेर त्या हरणाला पाय बांधून वरती काढले. यावेळी गणेश गोलेकर प्रवीण गोलेकर कांतीलाल गोलेकर, गोलेकर ,संभाजी खोबरे ॲड.पप्पू थोरात,कृष्णा थोरात, सिद्धेश्वर मोरे, यांनी देखील दोरखंड व इतर साहित्य आणण्यासाठी व वन्य जीव बाहेर काढण्यासाठी मदत केली, यावेळी मात्र वनविभागाचे कोणतेही अधिकारी व कर्मचारी आले नव्हते खर्डा बिट हवालदार रमेश शेंडे व लोखंडे मेजर कैलास पाटील हेही घटनास्थळी धाव घेतली होती तरुणांनी काळविट वाचविल्याबद्ल गावकऱ्यांनी कौतुक केले. काही क्षणात काळविट उड्या मारतच शेतशिवारात निघून गेले