वाई ,(प्रतिनिधी) – वाई पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक जितेंद्र प्रभाकर शहाणे यांनी काल (दि. 20) पदभार स्वीकारला. या आधीचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांची जिल्हा विशेष शाखेत बदली झाली असून, त्यांच्या जागी शहाण यांची नियुक्ती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केली. बाळासाहेब भरणे यांनीही सातारा येथे पदभार स्वीकारला.
जितेंद्र शहाणे हे मूळ पुण्याचे असून त्यांनी पोलीस दलात त्यांनी 30 वर्षे सेवा केली आहे. पोलीस उपनिरीक्षक म्हणून नागपूर, पुणे, लातूर, सोलापूर ग्रामीण, सांगली, मुंबई (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) आणि त्यानंतर पोलीस निरीक्षक म्हणून अमरावती, पुणे (सीआयडी) व सांगली येथे काम पाहिले.
मिरज येथे 2016 मध्ये पडलेल्या दरोड्याचा गुन्हा त्यांनी दोन दिवसांत उघडकीस आणला होता. वाई शहरातील वाहतूक समस्या, बालगुन्हेगारी रोखण्याबरोबर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे शहाणे यांनी सांगितले.