NETFLIX Free Jio plan : जिओकडे सध्या सर्वाधिक ग्राहक आहेत. कंपनीने आपल्या 44 कोटींहून अधिक युजर्ससाठी अनेक रिचार्ज प्लॅन लॉंच केले आहेत. एवढेच नाही तर जिओने युजर्सच्या सोयीसाठी प्लॅन्सची वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागणी केली आहे. ज्यामध्ये स्वस्त आणि महाग असे दोन्ही प्लॅन उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला जिओच्या अशा जबरदस्त रिचार्जविषयी माहिती देणार आहोत, ज्यात तुम्हाला अनेक फायद्यांसह नेटफ्लिक्स देखील फ्री मिळेल. | NETFLIX Free Jio plan
जिओच्या यादीत अनेक अल्पकालीन आणि दीर्घकालीन प्लॅन्स आहेत. जर तुम्हाला 365 दिवसांचा वार्षिक प्लॅन हवा असेल तर तुम्हाला Jio कडून तो देखील मिळेल. जिओकडे असे प्लॅन आहेत जे चांगल्या व्हीडीटीसह OTT चा लाभ देतात. | NETFLIX Free Jio plan
Jio च्या लिस्टमध्ये 1099 रुपयांचा प्लान आहे. कंपनीचा हा प्लॅन अनेक अर्थाने खास आहे. जर तुम्ही OTT स्ट्रीमिंग करत असाल तर पैसे वाचवण्यासाठी हा प्लॅन तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. जर तुम्ही तुमचा Jio नंबर 1099 रुपयांचा रिचार्ज केला तर तुम्हाला 84 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल, म्हणजेच तुम्ही 84 दिवस कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित मोफत कॉलिंग करू शकता. | NETFLIX Free Jio plan
जिओच्या अशा युजर्ससाठी देखील हा प्लॅन सर्वोत्तम आहे ज्यांना अधिक इंटरनेट डेटाची आवश्यकता आहे. Jio ग्राहकांना या परवडणाऱ्या प्लॅनमध्ये संपूर्ण व्हिलिडीटीसह एकूण 168GB डेटा ऑफर करते, म्हणजेच तुम्ही दररोज 2GB डेटा वापरू शकता. यामध्ये ग्राहकांना दररोज 100 एसएमएसची सुविधाही मिळते. | NETFLIX Free Jio plan
OTT चे पैसे वाचतील
जर तुम्ही ओटीटी स्ट्रीमिंग करत असाल आणि आतापर्यंत तुम्ही नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनसाठी वेगळे पैसे खर्च करत असाल, तर आता तुमचे पैसे वाचणार आहेत. रिलायन्स जिओ 1099 रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन देखील देत आहे. जे मोबाईल व्हर्जन असणार आहे. यासोबत जिओ सिनेमा आणि जिओ टीव्हीचे अतिरिक्त फायदेही यामध्ये देण्यात आले आहेत.